निर्मितीचे ओझे
जाळीदार झालेले
माझे दुपार उन-मन
निर्मिकाच्या ग्रंथात कोरते
अभिवचनाचे गोंदण
नववधू होऊन
मी ओलांडते राहते
क्षितीजाच्या चौकटी
प्रवेशते नेणत्या जाणीवात
तेव्हा--
आकाश जन्म घेते
शब्द जन्म घेतात
माझ्या गर्भात उदरात
आणि उदासीन निर्मिकाच्या
जीर्ण प्राचीन ग्रंथात
*निर्मितीच्या ओझ्याने
जाळीदार झालेले
माझे दुपार उन-मन
------कविता
No comments:
Post a Comment