Pages

Monday, 13 October 2014

अखंड सौभाग्य

अखंड सौभाग्य 


कवितेचा जग घेवून नाचते आहे 
मागते आहे जोगवा कवितेचा 
अनंत युगासाठी 

काळ भिक्षा घालेल माझ्या मना 
काळाच्या हातून प्राशेन विषामृत  
निर्मिती क्षणाला 

तदनंतर सर्वत्र उपलब्धी कवितेची 
उपाधी अनुपाधी अवघी मी कविता 
अखंड सौभाग्य 



----कविता 

No comments:

Post a Comment