Pages

Friday, 17 October 2014

तूझे दुःख

तूझे दुःख 



1

तुझ्याकडे आहे 
गत काळातल्या दुःखाची दुर्बिण 
तु पाहतोस त्या भिंगातुन
गिरकी घेणाऱ्या आयुष्याकडे  
भ्रमणाच्या गती चुकत नाहीत 
सम सापडते तुला जगण्याची 
गत काळातले दुःख 
जणु बाळकडू होते 
गात राहतोस तू जन्मभर 
तीच बडबडगीते 
दुःख सहन कर दुःख भजन कर 
पाठ होतात पाढे 
दुःख एक्के दुःख ,दुःख दुणे दुःख

2

तुझे दुःखाशी नाते होते 
माझे तुझ्याशी 
तुझे दुःख संपले 
तुझे देहमन पैलतीराशी 
मी उराशी कवटाळत राहते 
तुझे संपलेले दुःख

3

दुःखाला काळ नाही मन नाही 
अनादि आहे अथवा पुनः पुनःजन्मणारे
पाषाणाच्या प्रज्ञेप्रमाणे



----कविता 

No comments:

Post a Comment