संचित
तुझ्या पायात रुतलेत काटे
काढू दिले नाहीस कुणाला
रडत राहिलास वेदनेने
मी ऐकत राहिले तुझे रडणे
रुतलेले काटे निघाले तर
तर वाटते आहे तुला
जीव जाईल येथेच
आज ना उद्या
तू समृद्ध आहेस
तुझ्या जाणीवांनी
तू जगतो आहेस
तुझे आयुष्य
मला ओळखू येत नाही
माझे संचित
----कविता
No comments:
Post a Comment