Pages

Monday, 13 October 2014

चांदणे

चांदणे 



श्वासाची घागर । समुद्र जागर 
फुंकर फुंकर । चांदणे 
अर्थाची नक्षी । शब्दाचा पक्षी 
दूरदूर अंबर । चांदणे 
बकुळ गजरा । स्मृती सोयरा 
माहेर सुंदर । चांदणे 

नभ कातळ  । मेघ सुमनजळ   
धूप कापूर । चांदणे 
तुझे वैराग्य । माझे भाग्य  
ब्रम्ह अक्षर । चांदणे 
स्वप्न ओंजळ । कल्पना मोहोळ  
सत्य मधुमधुर । चांदणे 

सृष्टी माथा । दृष्टी अक्षता 
दिशा स्वयंवर । चांदणे 
याचक दान । पसरला पदर 
उजेड मुठभर । चांदणे 
प्राचीन घरदार । जंगम स्थावर 
कल्पाचे तरुवर ।चांदणे 



-----कविता 

No comments:

Post a Comment