कृष्णविवर
तुझ्या
विस्मरणाच्या
कृष्णविवरात
जगताना -
भूतकाळाच्या नात्यांचे कोरडे काष्ठ
उगाळले अथवा जाळले जात नाही
होऊन जाते नाविन्यपूर्ण कलाकृती
उर फुटेपर्येंत धावते काळजाचे हरीण
अदृश्य सांधल्या नात्यांच्या अरण्यात
निर्वाताचे कवच मंत्रित समुद्र वाळवंटी
आतून बाहेर बाहेरून आत शून्य अवघे
मी
वावरत
राहते
तुझ्या
विस्मृतितले
नाट्य
होऊन
तुझ्या विस्मृतीच्या मानसपुजेत
जोपर्येंत मला सापडत नाही
माझ्या विस्मरणाचे कृष्णविवर
------कविता
No comments:
Post a Comment