गुळ साखर
कुठल्या लाटेला संपतो समुद्र
माणसांच्या अलोट झुंडीच्या झुंडी
किती पक्ष्यांचे थवे उडतात आकाशी
गोंगाटाला का आहे करुणेचा स्वर
कुठे निघाली आहे भावनेची दिंडी
किती अथांग आहे मुंग्यांची रांग
मला आठवेनासे झाले आहे
कुठे ठेवली मी गुळ -साखर !
----कविता
No comments:
Post a Comment