प्रतिसादाचे आरसे
गावोगाव भटकत जाते
धुंडाळत जाते माळरान
धुळीने माखलेले फुल
आवडते माळते स्वप्नात
भेटतो आंधळा भिकारी
वाटून घेते माझी शिदोरी
मी ही पिते पाणी
त्याच्या वाडग्यात
भेटतात सहप्रवासी
ऐकते दूर डोंगराच्या कथा
घराकडे न परतलेल्या
घरातल्या माणसांच्या
मी शोधण्यास निघाले आहे
प्रतिसादाचे आरसे
मला भेटते मृगजळ
प्रेम आयुष्य कला
त्रयीचा संगम
----कविता
No comments:
Post a Comment