Pages

Wednesday, 1 October 2014

अदभूत वस्तू

अदभूत वस्तू 


अमुल्य अदभूत वस्तूंचे संकीर्ण पाहण्यास मी एकटी जाते 
न जोडता आलेली माणसे न सांधता आलेली नाती 
इतिहासाच्या पानावर शांतपणे नेटका झुंजार करून पहुडलेली  
माझ्या हातात आठशे वर्षापूर्वीचे जुने लाकूड असते 
न पाहिलेल्या खापरे लोकांबद्दल असणारा आदर 
तितकेच कुतूहल वेड या अरण्यातील जुन्या वस्तूंचे 
मला जोडता आलेली नाती इतिहास जमा होतात 
अमुल्य अदभूत वस्तूंचे संकीर्ण पाहण्यास मी एकटी जाते 


----कविता 

No comments:

Post a Comment