Pages

Wednesday, 1 October 2014

प्रतिसाद

प्रतिसाद  

देहात तरंग उठले 
क्षणात मीनले पाणी 
जळातून चाले नौका 
वाट पाहे माझी कुणी ?

डोहाचा पदर हालतसे 
चांदण्यात स्त्रवे पान्हा 
ओंजळीत पाणी मिटले 
भेटशील पुन्हा केव्हा ?

भरला पाण्याने घडा  
देहाची जाहली घागर 
ना दिसे देह ना पाणी 
तुझ्यावेगळे माझे घर   



----कविता 

No comments:

Post a Comment