Pages

Wednesday, 1 October 2014

भावबंध

भावबंध 

आंधळे माझेच डोळे 
आंधळी माझी प्रीती 
ओवाळीते जीव माझा 
आंधळे निरंजन वाती 

सुख दुःख तुला सांगते
ऐकणे न ठाऊक तुला 
बहिरे तुझे कान दोन्ही 
मौन वाहिले आहे तुला 

दगडावर वाहिले फुल 
फुलाला नेणता गंध 
वेदनेशी जडले नाते 
तुझा माझा भावबंध 


----कविता 

No comments:

Post a Comment