सृजन
उगवती न मावळती
तुझ्या डोळ्यात विरघळेल साखर
माझ्या डोळ्यात तरळेल पाणी
निर्मितीची ओढ तुला
मला पाहिजे जन्मभराचे वेड
या आकांक्षेला
बांधून ठेवणारे स्वप्न
तुझ्या प्रिय सहवासात
तू माझे योजलेले चित्र
साधशील तेव्हा -
रंगाचे देहरूप
त्या काळ कल्पनेला
आणि मी साकार सजीव
तुझ्या सृजनतेत
----कविता
No comments:
Post a Comment