Pages

Tuesday, 28 October 2014

जोगवा

जोगवा 


कविते 
माझ्या पारंपारिक मनातील 
चौर्याऐंशी लक्ष वृत्तीत  
कुठे तुला सापडली आहे  ?
जटीलतेची 'जट'

म्हणून 
तू नेसवलेस मला 
तुझे जन्माचे वस्त्र 
भरलास मळवटी  
तुझ्या जगण्याचा भंडार 

कविते 
तुझ्यासाठी मागते आहे 
तुझा जोगवा 


----कविता 

No comments:

Post a Comment