परिवलन
दुःखाचे नाचती मोर
अश्रुंचे झाले पैंजण
आवर्तन चाले सुखाचे
ओवती मणी स्पंदने
अत्तराचा देह झाला
दिवा ज्योत उजळली
गर्दीतुन शोधते वाट
चालली माझी यात्रा
परिवलनाचे मर्म जाण
माझ्या काळरुप स्नेही
---कविता
दुःखाचे नाचती मोर
अश्रुंचे झाले पैंजण
आवर्तन चाले सुखाचे
ओवती मणी स्पंदने
अत्तराचा देह झाला
दिवा ज्योत उजळली
गर्दीतुन शोधते वाट
चालली माझी यात्रा
परिवलनाचे मर्म जाण
माझ्या काळरुप स्नेही
---कविता
No comments:
Post a Comment