Pages

Wednesday, 1 October 2014

तुझे घर

तुझे घर 



तुझ्या घराचा पत्ता 
ठाऊक नाही मला 
ठोठावते आहे दरवाजा 
अनंत काळापासुन 

तुझे घर आहे 
भर उन्हाच्या वस्तीत 
वितळतात येथे सुख दुख
बंद दाराआड कोसळतो
वेदनांचा पाऊस

मी पोहोचले आहे
तुझ्या घरी
पाहते आहे तुझी वाट
तु शोधतो आहेस रस्ते
जे वितळले आहेत
माझ्या वाटेत



----कविता 

No comments:

Post a Comment