Pages

Wednesday, 1 October 2014

सुवास

सुवास 


तू हो जलबिंदुपरी वा कोवळेसे उन 
मी पसरट लांब तुझ्या जीवाचे पान 
तुझ्या दुःखाची प्रीती मी मोजते तारे 
जलाशयात दिसे आकाश विझले वारे 

तू पूर्ण चंद्र मी काजळलेली चंद्रभागा 
तुझ्यास्तव वाहिले मी जीवन अनुरागा  
अनुप्रास तुझ्या श्वासांचा वेचले प्राण 
फुलांची आंधळी दृष्टी तू सुवास जाण 


----कविता   

No comments:

Post a Comment