सत्यव्रत
त्याच्या ओंजळीत मासा आला
माश्याने सांगितले
मला तुझ्या कमंडलूत घे
लहानसा मासा
कमंडलुच्या आकाराचा होता झाला
म्हणून तो मोठ्या पात्रात सोडून दिला
मासा पात्राच्या आकाराचा झाला
सत्यव्रताने त्याला समुद्रात सोडले
तो संपूर्णतः समुद्र व्यापणारा झाला
मी पुनःपुन्हा वाचत राहते
पुराणातील या कथा
झरोक्यातून येणारे तांबूस सोनेरी उन
दडवत राहते कथेच्या पुस्तकात
कधीकाळी स्वतःला लिहिलेल्या
जपलेल्या पत्राप्रमाणे
कथेतल्या माश्याप्रमाणे
बदलत जातात माझ्या भोवतीचे
काळाचे दडवलेले अवयव
करू लागते विलयाचा प्रवास
मी होत जाते सनातन
माझ्या प्राचीन एकटेपणासह
स्वप्नांचा तुरुंग ओलांडून
भेटतात कल्पनेतली नक्षत्रे
विश्वबंद होतात खोलीतले दिवे
प्रलयाच्या पाण्याखाली खोल
मी ढाळत राहते अश्रू
कुठल्याश्या अस्पर्श स्पर्शावर
भेटतात कल्पनेतली नक्षत्रे
विश्वबंद होतात खोलीतले दिवे
प्रलयाच्या पाण्याखाली खोल
मी ढाळत राहते अश्रू
कुठल्याश्या अस्पर्श स्पर्शावर
कला विज्ञान तत्वज्ञान
सूर संगीत साथ
नाती माणस माया
शब्द कविता गाणी
मौन संवाद भाषांतरे
भरून जाते या पात्रातुनी
अज्ञाताचे अदृश्य पाणी
कुठेच नाही रमत
माझ्या जीवनाची मासोळी
वाट पाहत राहते
सूर संगीत साथ
नाती माणस माया
शब्द कविता गाणी
मौन संवाद भाषांतरे
भरून जाते या पात्रातुनी
अज्ञाताचे अदृश्य पाणी
कुठेच नाही रमत
माझ्या जीवनाची मासोळी
वाट पाहत राहते
सत्यव्रताची
त्याच्या ओंजळीत भरेल
या जीवनाचे भावविश्व
------कविता
त्याच्या ओंजळीत भरेल
या जीवनाचे भावविश्व
------कविता
No comments:
Post a Comment