Pages

Wednesday, 15 October 2014

तुझी होण्या

तुझी होण्या


मातीचे संस्कार | जोडव्याचे फुल
अंगणी पाऊले | कर्णिकेची
स्मृतीतले तोडे | स्वप्नाचे नर्तन
तदाकार वेली | देहमन
क्षितीज मेखला | भेट खुणगाठ
सृष्टीचे देवदुत | संगमरवरी
पर्णाचे बिलवर | पर्णाते मनोहर
मंद किणकिण | स्थितीची
कवडसा मुद्रीका | हृदयीचा मत्स्य
गिळे सुखवेदना | प्रीतीतली
सुराचा तन्मणी | प्राणाचे गंधर्व
गाताती वचन | नदीकाठी
नीलनिळे कुंतल | प्रतिभेचे जल
उभी पाठमोरी | शब्दकळा
तुझे आशीर्वचन | सौभाग्य भुषण
आले भेटावया | तुझी होण्या

----कविता

No comments:

Post a Comment