Pages

Monday, 20 October 2014

कथा पात्र संवाद

कथा पात्र संवाद 


कथेतल्या एकेक सगुण मनाच्या पात्राला ती बोलावते
सारी पात्रे जमतात ,अवतीभवती बसतात तिच्याजवळ
तिला म्हणू लागतात 'आम्हाला मिळाली आहे मुक्ती '
कथेच्या प्रदेशातली जीर्ण शरीरे टाकून दिली आम्ही

भावावस्थेच्या अर्धनिद्रिस्थ स्वर्गात आहे आमचा प्रवेश
तुझे शब्द हाक ध्वनी पोहोचणार नाहीत त्या अवकाशात
तेव्हा पुनः पुन्हा वाजवू नकोस संवादाचे चामडे
नाद उठतील आणि संपतील तुझ्या हलकल्लोळात

ती स्पर्श करू पाहते एकेक पात्राला ,पात्रे अदृश्य होतात
अदृश्य झालेल्या पात्रांच्या रित्या कथाचे रितेपण
गोल फेर धरून खेळ खेळते तिच्या एकटेपणाशी
"खुर्ची का मिरची ,खुर्ची का मिरची जाशील कैशी ?"


------कविता

No comments:

Post a Comment