Pages

Wednesday, 1 October 2014

माणूस आणि यक्ष

माणूस आणि यक्ष 



जगताना प्रतिके सापडली 
प्रतीकांच्या सृष्टीत 
साकारत चालली भावशिल्पे 

रंग रूप आकारात 
फसत चालले जगणे
फसलेल्या जगण्यात
हरवत चालली कला

हा आभास जड वाटू लागला
या जडाशी नाही जुळले नाते
या रंगातून नाही उडाले तरंग
मनाचा नाही झाला पक्षी

माणूस व्हायचे होते त्याला
कुठल्या दग्ध शापाने
यक्ष केले त्याला ?




----कविता

No comments:

Post a Comment