परीस आणि विष
तुझ्या तळहातावर माझी प्रतीकृती
त्याला नाहू घालते
तुझ्या डोळ्यातील उन पाणी
पाणी झिरपत नाही
साचत राहते तळे शिल्पाभोवती
कोंडतात प्रतिबिंबातले श्वास
बुडत जाते खोल माझी प्रतिमा
मी तरंगत पोहोचते किनाऱ्याला
कुणी कलंदर वाचवतो माझे प्राण
त्याला शौक प्रत्येक मृत्यु चुंबण्याचा
संग्रही आहेत त्याच्या
असे असंख्य आभास
प्रत्येक आभासाजवळ आहे
त्यांचे सत्य विश्व कल्पना
माझ्याजवळ आहे तू दिलेला परीस
पण तू का नाही दिलेस मला विष ?
इथे समान आहे परीस आणि विष
------कविता
No comments:
Post a Comment