कंदिल
ती आधी बाई होती
नंतर कामाठी झाली
तिच्याकडे आले आहेत दोन पुरुष
तिने एकाला दिले आहेत प्राण
एकाला दिली आहे शेज
ज्याला प्राण दिले आहेत
तो तिच्या हातात देतो कंदील
ज्याला शेज दिली आहे
तो तिला देतो कंदिलाची वात
कंदिलातली वात जळून जाते
कंदील मागे उरतो
तिला दिलेला कंदील
परतून नेण्यासाठी
माघारी तो फिरतो
आता ती कामाठी नसते
तिचा कंदील झालेला असतो
----कविता
ती आधी बाई होती
नंतर कामाठी झाली
तिच्याकडे आले आहेत दोन पुरुष
तिने एकाला दिले आहेत प्राण
एकाला दिली आहे शेज
ज्याला प्राण दिले आहेत
तो तिच्या हातात देतो कंदील
ज्याला शेज दिली आहे
तो तिला देतो कंदिलाची वात
कंदिलातली वात जळून जाते
कंदील मागे उरतो
तिला दिलेला कंदील
परतून नेण्यासाठी
माघारी तो फिरतो
आता ती कामाठी नसते
तिचा कंदील झालेला असतो
----कविता
No comments:
Post a Comment