प्रियकराचे घर
तो घरी सोबत नेतो
तो घरी सोबत नेतो
तिच्या निरर्थक आयुष्याला
त्याचे घर होऊन जाते
तिच्या प्रियकराचे
कुठेही दिशा हरवली
तरी सापडते तिला
प्रियकराचे घर
दिशेच्या पावलांनी
निघून जातो प्रियकर
सोडून त्याचे घर
तिची वाट पाहत राहते
प्रियकराचे घर
तिच्या निरर्थक आयुष्याला
सोबत करते प्रियकराचे घर
-----कविता
No comments:
Post a Comment