चैतन्याचे मृगजळ
संचिताची जाणीव संपली, भास मनाला
कुठेतरी काठोकाठ भरले आहे एकटेपण
तुझा पाय लागुन ओहळत का नाही भाबडे ?
तुझ्या सावलीत स्थापिले आहे माझे उन्ह
चैतन्याचे मृगजळ तळमळ लावते जीवाला
चालत नाही वाटसरू रात्रीचा दिसतो तरू
तू लाव दिवा अथवा फुंक चांदण्याची रक्षा
-----कविता
No comments:
Post a Comment