परप्रकाशी
फुलपाखराच्या रंगाचे जहाज
वाळवंट आणि समुद्र रंगीबेरंगी
दूरवर केशरी उन्हाच्या लाटा
कैक स्वप्नांचा प्रवास रंगाचा
गंधाच्या कुपीचे अवकाशयान
अवकाशयानातून उतरतात
सुंगधी माणसे सुगंधी देश
कैक स्मृतींचे आयुष्य गंधाचे
आदि अंत योजना परमसत्तेची
अंतरिक्षामध्ये मिट्ट काळोख
नाही रंग नाही गंध निर्वातात
ग्रहगोल शब्द नुसते परप्रकाशी
-----कविता
No comments:
Post a Comment