प्रेमकथा
काळाचा सर्प बसला आहे दडी मारून
प्रेमकथेला आरंभ नाही अंत नाही
कुणी जाणला आहे मध्य अनंताचा
प्रेमकथेत आनंद नाही वेदना नाही
सूर्योदय सूर्यास्त एकाच क्षितिजावर
मला प्रेम उमजले नाही ना प्रेमकथा
तळहातावर दिलेस वचन जन्मांचे
याचे साकारले आहे कुणीसे शिल्प
लुप्त झाले तेव्हा जगण्यात माझ्या
----कविता
No comments:
Post a Comment