Pages

Tuesday, 14 October 2014

दार उघड बये

दार उघड बये


अचानक एकाएकी
एकटेपण
तुंग हिमालयासारखे

अश्रूतून वृक्ष 
ठायीठायी घेत जन्म
कोसळणारे

माझा प्राण
कुठल्याश्या प्राणाच्या
हलाहलात

या एकांताची
कातरवेळ
आली तुझ्या उंबरयावर

सूर्यास्ताकडे
मुख अथवा पाठ
आडवे अंधातरी
एकटेपण

बैरागी फिरतो दारोदार
मागत काळाची भिक्षा

काळांतकला काळ
भेटू दे
तुझ्या घरी

दार उघड बये sssss
दार उघड ssss


----कविता 

No comments:

Post a Comment