मेघमय
ऋतू शाहणे वेडे वाकुडे
नभ फांदीवरती झुलतात
वाऱ्यास नाही तन्मय छत्र
अंतराळी शुभ्र पक्षी स्वतंत्र
उड उडाला स्थलांतरित
चांदीचा ब्रम्ह कल्प सुमनी
फुलांचे दिवे काळ डोहात
तलम रेशमी गात्ररात्र
रुणु झुण पल्लव पापणी
रुणु झुण जीवाचा मोती
धवलधुके चांदणे सुखांत
देह नागवा पाठ उघडी
जांभळा कोळी घर बांधतो
मायाजाल वनिता एकांत
अपूर्व शांतीचा खोल गर्त
देह विदेह मेघमय अवघे
जळतो कापूर निळेपणात
------कविता
No comments:
Post a Comment