Pages

Monday, 6 October 2014

निर्मितीचे झाड

निर्मितीचे झाड 


तुझ्या माझ्या मध्ये निर्मितीचे झाड 
या झाडाला लागतात विषारी फळे 
चाखणारा होतो पुनः निर्मितीचे झाड 
या झाडाने द्यावी लागतात फळे 
फळे न चाखणाऱ्या सोबत्याला 

फळे न चाखणारा फुलवत राहतो 
विष आसक्त झाडांचा बगीचा 
प्रत्येक झाडाचा वंश रुजतो त्यात 
पण तो झाड होत नाही निर्मितीचे  

फळे चाखणाऱ्याला लाभते 
अवेदनेची मर्यादता 
फळे न चाखणाऱ्याला लाभते 
असंजीवनेची चिरंतनता 

माझ्या प्रिय अनुरागा 
तुला चाखावी लागतील 
या झाडाची विषारी फळे 


------कविता 

No comments:

Post a Comment