सुतक आणि सोयर
गेल्या अनेक पिढ्यांचे दुष्काळ
पाहिले आहेत अज्ञाताच्या विहरीने
त्या विहरीसमोर बसून आहे 'ती' अखंड
पिंगळ्याने वर्तवली आहे भविष्यवाणी
दहा दिवस दहा रात्र अखंड अविरत
संततधार पावसाने भरेल विहीर
ती आजन्म रखडली आहे विहिरीसमोर
ती' रडली नाही जन्म क्षणापासून
आश्रित आहे अपार नेणत्या दुःखाची
जगण्याची एकमात्र तीच भोळी आशा
वर्तवलेली भविष्यवाणी खरी ठरली
दहा दिवस दहा रात्र पाऊस कोसळला
विहीर भरली ,ती धाय मोकलून रडली
वेदने --
तू कुणाचे सुतक पाळत होतीस
म्हणून तुझ सोयर केल नव्हतेस मला ?
----कविता
गेल्या अनेक पिढ्यांचे दुष्काळ
पाहिले आहेत अज्ञाताच्या विहरीने
त्या विहरीसमोर बसून आहे 'ती' अखंड
पिंगळ्याने वर्तवली आहे भविष्यवाणी
दहा दिवस दहा रात्र अखंड अविरत
संततधार पावसाने भरेल विहीर
ती आजन्म रखडली आहे विहिरीसमोर
ती' रडली नाही जन्म क्षणापासून
आश्रित आहे अपार नेणत्या दुःखाची
जगण्याची एकमात्र तीच भोळी आशा
वर्तवलेली भविष्यवाणी खरी ठरली
दहा दिवस दहा रात्र पाऊस कोसळला
विहीर भरली ,ती धाय मोकलून रडली
वेदने --
तू कुणाचे सुतक पाळत होतीस
म्हणून तुझ सोयर केल नव्हतेस मला ?
----कविता
No comments:
Post a Comment