Pages

Wednesday, 1 October 2014

संथ चालले जीवन

संथ चालले जीवन



आंधळ्या स्मृतींचे आळवीत गाणे 
रस्तोरस्ती भटकतो आहे जोगी 
फुल समजून गंधाळत आहे श्वास 
महालात शुभ्र दर्पणात कुणी उभी 

टांग्यातुनी यक्ष पाहतो त्याचे घर 
अनाथपण भोगती आकाशाचे स्वर 
नदीच्या पाण्यात उमटते चांदणे 
अश्रूविद्या लावते देहास अत्तर 

तबकडीत हरवला सिंड्रेलाचा बूट 
गोकुळात कृष्ण विसरला बासरी 
कुणाचे बालपण कथेत ऐके कथा   
मौनाचे स्तवन ऐकु जाई सर्वदुरी 

झाडाच्या खांद्यावर विसावे घरटे 
शांत एकाकी पानामधुनी सळसळ 
संथ चालले जीवन संथ चाले काळ 
कोणते वचन पाळती पायात चाळ ?


-----कविता 

No comments:

Post a Comment